
आजारी पडला म्हणून चोराला रुग्णालयात केलं दाखल, रिपोर्ट आल्यानंतर हादरलं संपूर्ण पोलीस स्टेशन
पंजाबमधील लुधियाना येथून एका चोरास अटक केली गेली. दोन दिवसानंतर, जेव्हा त्यांची तब्येत बिघडली तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांना कोरोनाची लक्षणे दिसल्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चोराची चाचणी पॉझिटिव्ह आढळली. यानंतर पोलिस ठाण्यात खळबळ उडाली. त्यामुळे तब्बल 17 पोलिसांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
लुधियानामध्ये घडलेल्या या प्रकारानंतर खळबळ माजली आहे. 17 पोलिसांना क्वारंटाइन केल्यानंतर इतर पोलिसांचीही चाचणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चोराच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सध्या सुरू आहे. या चोराला कम्युनिटी ट्रान्समिशनमधूनच कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.