Type Here to Get Search Results !

माणुसकीला सलाम...! हिंदू व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी मुस्लिम बांधवांचा पुढाकार, मुंबई आणि सोलापुरात माणुसकीचे दर्शन

हिंदू समाजातील व्यक्तीचं काल निधन झालं मात्र त्या व्यक्तीचे आप्तस्वकीय लॉकडाऊनमुळे पोहोचू शकले नाहीत. मात्र याचवेळी सामाजिक सौहार्दाचं उदाहरण देत त्या हिंदू व्यक्तीचे हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार केले.

Muslim Brothers Initiative for the funeral of a Hindu personकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  21 दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर लोकांना घरीच राहण्याचं आव्हान लोकांना करण्यात आलं. त्यासोबत संचारबंदीमुळे लोकांच्या प्रवासाला सुद्धा ब्रेक लागला.अशा परिस्थितीमध्ये जर कोणी मृत पावलं तर त्यांच्याकडे सुद्धा जाता येत नसल्याचे चित्र आहे. अशीच एक घटना मुंबई आणि सोलापुरात घडली. सोलापुरात एका आणि मुंबईतील एका हिंदू समाजातील व्यक्तीचं काल निधन झालं मात्र त्या व्यक्तीचे आप्तस्वकीय लॉकडाऊनमुळे पोहोचू शकले नाहीत. मात्र याचवेळी सामाजिक सौहार्दाचं उदाहरण देत मुस्लिम बांधवांनी त्या हिंदू व्यक्तीचे हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार केले.
वांद्रे येथील गरीबनगरमध्ये राहणारे प्रेमचंद महावीर यांचे काल निधन झाले. त्यांच्या मुलांनी नातेवाईकांना आणि भावाला कळवले. पण संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे कोणी येऊ शकले नाही. नातेवाईक आणि भाऊ राजस्थान, पालघर या ठिकाणी असल्यामुळे त्यांच इथे येणं कठीण होतं.


ज्यामुळे त्यांच्या अंत्यविधी कसा करणार हा प्रश्न उभा राहिला. अशावेळी महावीर यांच्या शेजारी राहणारे मुस्लिम बांधव पुढे आले. सामाजिक एकोपा जपत मुस्लिम बांधवांनी प्रेमचंद महावीर यांना आपल्या खांद्यावर घेऊन हिंदू समशानभूमीमध्ये 'राम नाम सत्य है' चा जप करत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यास महावीर कुटुंबीयांना मदत केली.

यामुळे प्रेमचंद महावीर यांच्या मुलाने या सर्वांचे आभार मानले आहेत. अशा वेळी शेजाऱ्यांकडून झालेली ही मदत आयुष्यभर विसरणार नसल्याचं त्यांनी सांगितला. तर त्यांच्याच शेजारी राहणारे युसूफ शेख यांनी हा शेजारधर्म आणि माणुसकीचा धर्म आहे जो आम्ही पार पाडला आणि अशाच माणुसकीची गरज सध्या या परिस्थितीमध्ये आहे, असं सांगितलं. कोरोनाच्या या महामारीत अशा सामाजिक एकोप्याच्या घटना माणुसकीचे नवे आयाम दाखवत आहेत.

Post a Comment

0 Comments