Type Here to Get Search Results !

लॉकडाऊनमुळे पतीनं माहेरी सोडण्यास दिला नकार, पत्नीनं दोन मुलींसह विहिरीत घेतली उडी

लॉकडाऊनमुळे पतीनं माहेरी सोडण्यास दिला नकार, पत्नीनं दोन मुलींसह विहिरीत घेतली उडी
बेबीजान यांचं कर्नाटक राज्यातील विजापूर हे माहेर आहे. बेबीजान हिला माहेरी जायचं होतं



लॉकडाऊनमुळे पतीनं माहेरी सोडण्यास दिला नकार, पत्नीनं दोन मुलींसह विहिरीत घेतली उडीसांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका गावात विवाहितेनं तिच्या दोन चिमुरड्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेला तिच्या माहेरी जायचं होतं. पण राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. त्यामुळे पतीने माहेरी सोडण्यास नकार दिला. याच रागातून विवाहीतेने तिच्या दोन पोटच्या मुलांसह गावातील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.




बेबीजान इब्राहिम नदाफ (वय-32), जोया इब्राहिम नदाफ (वय-5) आणि सलमान इब्राहिम नदाफ (वय-3) असे मृतांची नावं आहेत.

आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा .इथे क्लीक करा .


याबाबत मिळालेली माहिती अशी की, जत तालुक्यातील नवाळवाडी गावात ही घटना घडली आहे. बेबीजान यांचं कर्नाटक राज्यातील विजापूर हे माहेर आहे. बेबीजान हिला माहेरी जायचं होतं. देशात लॉकडाऊन आहे. बस बंद आहेत. त्यामुळे मोटरसायकलवरुन माहेरी सोडा असा तगादा बेबीजान हिने पतीकडे तगादा लावला होता. मात्र, सगळीकडे लॉकडाऊन असल्याने पतीने तिला विजापूरला सोडायला नकार दिला. या रागातून बेवीजान हिने पोटच्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. जत पोलिसांत या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments