Type Here to Get Search Results !

कोरोना रुग्णांच्या पायावर डाग; Coronavirus चं लक्षण आहे?

स्पेन, इटली, फ्रान्समधील coronavirus रुग्णांच्या पायावर असे डाग (bruising and lesions on feet) दिसून आलेत.





सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यात त्रास ही कोरोनाव्हायरसची (coronavirus) मुख्य लक्षणं आहेत, मात्र आता काही कोरोना रुग्णांच्या पायावर कांजण्यांसारखे डाग दिसू लागलेत.

कोरोना रुग्णांच्या पायावर डाग;  Coronavirus चं लक्षण आहे?स्पॅनिश जनरल काऊंसिल ऑफ ऑफिशियल पॉडिआट्रिस्ट कॉलेजने (The spanish general council of official podiatrist colleges)अशी काही प्रकरणं दिसल्याचं म्हटलं आहे. डेली मेलने याबाबत वृत्त दिलं आहे.

स्पेनच्या डॉक्टरांनी सांगितलं, कोरोना रुग्णांच्या कांजण्या, गोवरसारखं काही तरी दिसत आहे. विशेषतः लहान मुलं आणि तरुणांमध्ये हे जास्त प्रमाणात पाहायला मिळालं. तर काही प्रकरणात वयस्कर व्यक्तींमध्येही अशा जखमा दिसल्यात. या जखमा ब-याही झाल्यात शिवाय त्याचे डागही राहिले नाहीत.

इटली आणि फ्रान्समध्येही अशी प्रकरणं असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं आहे. इटलीतल्या एका हॉस्पिटलमधील प्रत्येक 5 पैकी एका कोरोना रुग्णाच्या त्वचेवर अशा जखमा दिसल्यात. एलेसँड्रॉ मँजोनी हॉस्पिटलमध्ये 88 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला होता. त्वचेवर अशा जखमा रक्तवाहिन्यांना सूज आल्याने होतात, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा .इथे क्लीक करा .


कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील त्वचारोग प्राध्यापक रँडी जॅकब्स यांनी सांगितलं, कोविड-19 मुळे त्वचेवर असा परिणाम दिसू शकतो का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे आणि त्याचं उत्तर आहे हो. कोविड -1 मध्ये 'लहान रक्तवाहिन्यासंबंधाची लक्षणे दिसू शकतात.

लंडनमधील डॉ. डॅनियल गॉर्डन डेली मेलशी बोलताना म्हणाले, व्हायरस शरीराच्या फक्त एकाच भागावर नव्हे तर वेगवेगळ्या भागावर परिणाम करतो. अनेक व्हायरसमुळे त्वचेच्या अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे कोरोनाव्हायरसमुळे त्वचेवर अशी लक्षणं दिसल्यास आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. मात्र फक्त काही प्रकरणांवरून आपण हे कोरोनाव्हायरसचं लक्षण असू शकतं असं नाही म्हणू शकत. त्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे.

दरम्यान स्पेनच्या एका हेल्थ सेंटरचे डॉक्टरही कोविड स्किन स्टडी करत आहेत. स्पेनमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी आता ज्यांच्या पायावर असे निशाण सापडलेत अशा कोरोनाग्रस्तांची माहिती जमवणं सुरू केलं आहे.


Post a Comment

0 Comments